0
नांदेड- फ्रेंच कंपनीकडून रफाल या लढाऊ विमानांची खरेदी करताना तब्बल 41 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध मंगळवारी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले.

मंगळवारी सकाळी 11 वाजता या महामोर्चाची सुरुवात आयटीआय चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून झाली. महामोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सह प्रभारी आशिष दुआ, आ.संपतकुमार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी केली.
भाजप सरकारने रफाल विमान खरेदीमध्ये केलेल्या 41 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारासोबतच पेट्रोल आणि डिझेलचे आकाशाला भिडलेले भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलित आणि अल्पसंख्याक समाजावरील अन्याय, चुकीचे शैक्षणिक धोरण, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी यावरही काँग्रेस पक्षाच्या वतीने आवाज उठवण्यात आला.
महामोर्चात महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यासह महापौर शीलाताई भवरे यांच्यासह शमीम अब्दुल्ला, स.वीरेंद्रसिंग गाडीवाले, माधवराव मिसाळे, शीलाताई निखाते, संगीता तुपेकर, अलका शहाणे, विजय येवनकर, संजय देशमुख लहानकर, संतोष पांडागळे, मुन्तजिब, पप्पू कोंडेकर, विठ्ठल पावडे, गंगाधर सोंडारे, कविता कळसकर, पुष्पा शर्मा, शंकर शिंदे उपस्थित होते. 

रफाल विमान खरेदीमध्ये केलेल्या 41 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारासोबतच पेट्रोल आणि डिझेलचे आकाशाला भिडलेले दर..

  • Congress Mahamorcha in Nanded against BJP Government For rafale deal Scam


Post a comment

 
Top