0
      • Helpless Dead person's Asthi visarjanपुणे - अपघात किंवा इतर कोणत्याही कारणाने अनेक जण मृत्युमुखी पडतात. काही मृतदेहांची ओळख पटवणेदेखील अवघड असते. त्यामुळे असे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. आप्तेष्ट, नातेवाईक कोणीही नसल्याने त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कारदेखील होत नाहीत. अशा बेवारस मृतदेहांच्या अस्थी विसर्जित कोण करणार, असा विचार करून गेल्या ७ वर्षांपासून सातत्याने बेवारस मृतांच्या अस्थी विधिवत विसर्जित करण्याचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रीय कला अकादमीतर्फे करण्यात येत आहे.

        मृत व्यक्तीची जात कोणती हे न बघता, जाती-धर्माच्या पलीकडे जात सद््भावनेतून अकादमीच्या कलाकारांनी अस्थींचे विधिवत विसर्जन केले. त्यामुळे अखेर बेवारस मृतांच्या अस्थींची प्रतीक्षा संपली आणि त्या बेवारस मृतांच्या आत्म्याला शांती लाभली. 
        सर्वपित्री अमावास्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले. या वेळी नगरसेविका लता राजगुरू, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, अंकित काणे, हर्षद धर्माधिकारी, नितीन पंडित, डॉ. मिलिंद भोई, पीयूष शहा, कुमार रेणुसे, बाळा शुक्ला, विश्वास भोर, अक्षय माने, राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन, रोमा लांडे, योगेश गोलांडे, अतुल सोनवणे, अमर लांडे, सुप्रिया मुरमुरे, विवेक टिळे यांच्यासह महानगरपालिकेचे सेवक विक्रम सरोदे, नागेश लांडगे, अजय चव्हाण उपस्थित होते.
        सर्वपित्री अमावास्येला दरवर्षी उपक्रम
        मंदार रांजेकर म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे अाठवे वर्ष आहे. पुण्यामध्ये अनेक बेवारस मृतदेह येतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी विधिवत होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विधिवत विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावास्येला या अस्थी विसर्जित केल्या जातात. बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात आल्याचे त्यांनी सांगित
      मृत व्यक्तीची जात कोणती हे न बघता, जाती-धर्माच्या पलीकडे जात सद््भावनेतून अकादमीच्या कलाकारांनी अस्थींचे विधिवत विसर्जन केले. त्यामुळे अखेर बेवारस मृतांच्या अस्थींची प्रतीक्षा संपली आणि त्या बेवारस मृतांच्या आत्म्याला शांती लाभली. 
      सर्वपित्री अमावास्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले. या वेळी नगरसेविका लता राजगुरू, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, अंकित काणे, हर्षद धर्माधिकारी, नितीन पंडित, डॉ. मिलिंद भोई, पीयूष शहा, कुमार रेणुसे, बाळा शुक्ला, विश्वास भोर, अक्षय माने, राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन, रोमा लांडे, योगेश गोलांडे, अतुल सोनवणे, अमर लांडे, सुप्रिया मुरमुरे, विवेक टिळे यांच्यासह महानगरपालिकेचे सेवक विक्रम सरोदे, नागेश लांडगे, अजय चव्हाण उपस्थित होते.
      सर्वपित्री अमावास्येला दरवर्षी उपक्रम
      मंदार रांजेकर म्हणाले, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे अाठवे वर्ष आहे. पुण्यामध्ये अनेक बेवारस मृतदेह येतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी विधिवत होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विधिवत विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावास्येला या अस्थी विसर्जित केल्या जातात. बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभावी यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Top