0
  • Raju Shetty meet Prakash Ambedkarमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टी नेमके कुणाला साथ देणार याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राजू शेट्टी यांनी अद्याप कोणाबरोबर जायचे याचा निर्णय घेतलेला नसून, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्यालाच साथ देणार असल्याची त्यांची भूमिका असल्याचे समजतेय. दरम्यान राजू शेट्टी यांच्याबरोबर या भेटीदरम्यान शिक्षक आमदार कपिल पाटील यांचीही उपस्थिती होती.


    गेल्यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपला साथ दिली होती. पण शेतकरी विरोधी धोरणांमुळे संताप व्यक्त करत राजू शेट्टी एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, फडणवीस आणि केंद्र तसेच राज्य सरकारवर वारंवार टीका केली आहे.

    पवारांबरोबर जाणार अशी होती चर्चा 
    राजू शेट्टी यांनी भाजपच्या विरोधात राळ उडवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी राजू शेट्टी शरद पवारांबरोबर जाणार अशी चर्चा होती. त्याबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात होते. पण राजू शेट्टी यांनी मात्र अद्याप त्यांची भूमिका जाहीर केलेली .....
    .........

Post a comment

 
Top