- पुणे- पुण्यातील मुंढवा परिसरातील सराफ व्यापाऱ्यावर ५ हल्लेखाेरांनी काेयत्याने हल्ला करून दुकान लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यात व्यापारी मिलन साेनी जखमी झाले अाहे.
साेनी यांचे केशवनगरात हरिकृष्ण ज्वेलर्स दुकान अाहे. बुधवारी दुपारी दुकानात ५ जण शिरले. त्यांनी एकटेच असलेले दुकान मालक साेनी यांना काेयत्याचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, साेनी यांनी अारडाअाेरड केली. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करत पलायन केले. त्यानंतर शेजारी दुकानदारांनी सोनी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment