0
औरंगाबाद - अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना अखेर अंतिम वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बुधवारी (१७ ऑक्टोबर) घेतला. अभियांत्रिकी विद्यार्थी कृती समितीने ११ सप्टेंबरपासून कॅरीऑनच्या मागणीसाठी विद्यापीठात आंदोलन सुरू केले होते.


यादरम्यान कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दोन वेळा व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. पैकी पहिल्या बैठकीत यापुढे कोणत्याही अभ्यासक्रमाला कॅरीऑन न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अचानक कुलगुरूंनी निर्णय फिरवत कॅरीऑन दिला. कुलगुरूंनी वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये कॅरीऑन मागणाऱ्या विद्यार्थ्यांसह परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांची टिंगल केली होती. यातून अंशत: का होईना बाहेर पडण्यासाठी कॅरीऑन दिल्याची खमंग चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.


चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टिम अर्थात श्रेयांक पद्धत लागू होणार असल्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कॅरीऑन देण्याची मागणी केली होती. कुलगुरूंनी कॅरीऑनची मागणी फेटाळून लावण्यासाठी तातडीने व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली होती. या बैठकीत यापुढे कधीही आणि कोणत्याच अभ्यासक्रमाला कॅरीऑन देण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण विद्यार्थीदेखील कॅरीऑनच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वेळा प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले होते. तरीही कुलगुरूंसह प्रशासन कॅरीऑन न देण्याच्या निर्णयावर ठाम होते. पण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एका बैठकीत कॅरीऑन देणे योग्य असल्याचे म्हटले होते. तरीही कॅरीऑन देणार नसल्याचा आमचा निर्धार असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी म्हटले होते.

त्यानंतर पुन्हा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होते. समितीने मागील वर्षी कॅरीऑन देण्याचा निर्णय झालेला असल्यामुळे यंदाही कॅरीऑन देण्याची शिफारस केली होती. पण कुलगुरूंनी पुढे संजय निंबाळकर समितीच्या शिफारशी स्वीकारण्याऐवजी केराची टोपली दाखवली होती.

त्यांच्या निवासस्थानी एक अधिसभा सदस्य आणि एका व्यवस्थापन परिषद सदस्याशी चर्चा करताना कुलगुरूंनी स्वत:च अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आणि निंबाळकर यांची खिल्ली उडवली होती. यासंदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे कुलगुरू वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यातून अंशत: होईना बाहेर पडण्यासाठी कुलगुरूंनी बुधवारी (१७ ऑक्टोबर) अधिष्ठाता मंडळाची बैठक दाखवून कॅरीऑन देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीई, बीटेक आणि बीअार्किटेक्चरला लाभ 
बीई, बीटेक आणि बॅचलर ऑफ अार्किटेक्चरच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात प्रवेश देेण्यात येणार आहे. त्यांना क्लासवर्क, प्रयोगशाळेतील प्रकल्प, टर्मवर्क करNews about engineering third year studentण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाची शिष्यवृत्ती मिळ

Post a Comment

 
Top