0
मुंबई : ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गासह हार्बरवरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक काळातील कामे करण्यात येतील.
ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतील. यामुळे ठाणे-कल्याणमधील वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असल्याने लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. 

ब्लॉक काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाºया जलद व अर्धजलद लोकल फेºयांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, ब्लॉक काळातील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.
पनवेल-वाशी लोकल सेवा बंद
हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक काळात या मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांसाठी सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ मार्गावर विशेष फेºया चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Post a Comment

 
Top