0
  • Video of Staff get emotional after transfer of Police inspector in Puneपुणे - आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांना निरोप देताना त्यांच्या सहकाऱ्यांना भावना अनावर झाल्या. यावेळी कर्मचारी अक्षरशः रडले आणि त्याचा व्हिडिओदेखिल सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.


    पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. गायकवाड यांनी आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्याची मागणीही करण्यात येत आहे. मनसेने पोलिस ठाण्याबाहेर ही बदली रद्द करण्याची मागणी करत आंदोलनही केले. पण अद्याप बदली रद्द झालेली नाही. दरम्यान गायकवाड यांनी नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी पोलिस ठाण्याचा निरोप घेतला तेव्हा त्यांचे सहकारी कर्मचारी अक्षरशः ढसाढसा रडले. गायकवाड यांनाही यावेळी अश्रू अनावर झाले होते. त्याचा एक व्हिडिओदेखिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Post a Comment

 
Top