परभणी - अापल्याच शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेची १६ एकर ८ गुंठे जमीन हडपल्याप्रकरणी माजी शिवसेना खासदार तथा राष्ट्रवादीचे विद्यमान नेते गणेशराव दुधगावकर यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. निवृत्त तलाठी डी.एस. कदम यालाही याच प्रकरणात शुक्रवारी रात्री अटक केली होती. दरम्यान, न्यायालयाने दुधगावकर यांना दाेन तर कदम यांना तीन दिवसांची काेठडी सुनावली.
ज्ञानोपासक महाविद्यालय ही दुधागावकरांची संस्था अाहे. येथील १३५ कर्मचाऱ्यांनी १९९४ मध्ये निवासस्थानासाठी १६ एकर ८ गुंठे जमीन घेतली होती. मुख्य प्रवर्तक म्हणून नारायण बुलंगे यांच्या नावे सर्व्हे ६१३ मध्ये ही जमीन खरेदी केली हाेती. परंतु दुधगावकर यांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून २०१२ मध्ये ही जमीन स्वतः खरेदी केल्याचे दाखवून तशी नोंद शासकीय दप्तरी केली. याप्रकरणी तत्कालीन प्राचार्य बाबूराव सोळुंके यांनी १६ डिसेंबर २०१७ राेजी दुधगावकर, तत्कालीन तलाठी डी.एस.कदम, निवृत्त तलाठी रावसाहेब पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसीलदार व्ही.जी.गायकवाड व निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्याविराेधात पाेलिसात तक्रार दाखल केली हाेती. त्यावरून गुन्हे नाेंद झाले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment