- वी दिल्ली - शुक्रवारी रात्री उशिरा एक टॅम्पो ट्रॅक्स कुत्र्याला धडकला त्यात तो कुत्रा किरकोळ जखमी झाला. पण त्या कुत्र्याला फिरवणाऱ्या तरुणाला मात्र प्रचंड राग आला. त्यामुळे टेम्पोचा ड्रायव्हर आणि त्या तरुणामध्ये वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, त्या तरुणाने त्याच्या आणकी दोन साथीदारांना बोलावले. त्या तिघांनी मिळून ड्रायव्हरला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तसेच मृताचा भाऊ या सर्व गोंधळात मोठ्या प्रमाणात जखमीही झाला. मृताचे नाव विजेंद्र राणा (40 ) असून त्याच्या जखमी भावाचे नाव राजेश राणा (45 ) आहे.
घराच्या गेटमधून नेले ओढत
सुरुवातीला वाद झाल्यानंतर मृत विजेंद्र त्याच्या घरापर्यंत पोहोचला होता. पण आरोपी अंकितला राग अनावर झालेला होता. त्याने त्याचा भाऊ पारस आणि भाडेकरू देव चोप्राला बोलावले. तिघे विजेंद्रच्या गेटजवळ गेले आणि त्याला आवाज दिला. तो बाहेर येताच त्याला फरफटत गल्लीत नेले आणि मारहाण केली. त्याचवेळी विजेंद्रचा भाऊ राजेश रामा कामावरून परतत होता. त्यालाही मारहाण करण्यात
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment