0
Indian passport ranked 81th in the world
  • नवी दिल्ली- जपानमधील पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली असून भारत ८१ व्या क्रमांकावर आहे. हेनली अँड पार्टनर्स या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण कंपनीने जगभरातील पासपोर्टची रँकिंग तयार केली आहे. एखाद्या देशाच्या पासपोर्टवर इतर किती देशांमध्ये विनाव्हिसा प्रवेश मिळतो या आधारावर रँकिंग झाले. या वर्षी म्यानमारने जपानच्या पासपोर्टवर विनाव्हिसा प्रवेशाला मान्यता दिली. या निर्णयानंतर जपानी पासपोर्टवर १९० देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांनी सिंगापूरला मागे टाकले. सिंगापूरच्या पासपोर्टवर १८९ देशांमध्ये विनाव्हिसा प्रवेश मिळतो. तर याचबाबतीत जर्मनी (१८८) तिसऱ्या क्रमांकावर आहे.


    भारताच्या पासपोर्टवर ६० देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळतो. मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या रँकिंगमध्ये ६ स्थानांनी सुधारणा झाली. परंतु मागील ५ वर्षांत रँकिंग ५ स्थानांनी घसरले. मागील वर्षी भारत ८७ व्या स्थानी हाेती. हेनली अँड पार्टनर्स २००६ पासून रँकिंग जाहीर करते. २००६ मध्ये भारत ७१ व्या स्थानावर होता. म्हणजे आतापर्यंत १० रँकनी घसरण झाली. २०१५ मध्ये भारताची रँकिंग सर्वात वाईट ८८ व्या क्रमांकावर होती. एखाद्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंधांची स्थिती पासपोर्ट रँकिंगद्वारे दर्शवली जाते. यादीमध्ये अमेरिका व ब्रिटनचे पासपोर्ट संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी आहेत. दोन्ही देशांचे पासपोर्ट १८६ देशांमध्ये मान्य आहेत. चीन ७१ व्या आणि रशिया ४७ व्या स्थानावर आहे. पाकिस्तान १०४, तर बांगलादेश १०० व्या स्थानी आ
  • हे.

Post a Comment

 
Top