0
  • Two Devotee were crushed by containersसिन्नर- नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरहून ज्योत आणताना साळोळे (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील भक्तांना नांदूरशिंगोटेजवळ भीषण अपघात झाला. ज्योतीत तेल घालण्यासाठी थांबले असतानाच भरधाव आलेला कंटेनर भाविकांच्या जत्थ्यात घुसला. यात दोन ठार तर १८ जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.


    तुळजाभवानी मंडळाचे ४० कार्यकर्ते मंगळवारी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास नांदूरशिंगोटेजवळील निमोण नाका बोगद्याजवळ आले. काहीजण ज्योतीत तेल घालत रस्त्याच्या डाव्या बाजूला होते तर काही ट्रक व तीन दुचाकींवर होते. याचवेळी पाठीमागून आलेला कंटेनर (एम.एच. ०४, जीसी ६८७) रस्त्याच्या कडेला थांबलेल्या भाविकांत घुसला. यात अक्षय शिवाजी बोकुड (२२, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) व बबन गोविंदराव रवंदाळे (२३, रा. लहानगेवाडी, ता. इगतपुरी) हे जागीच ठार झाले. सावध झालेले काहीजण पळाल्याने ते अपघातातून बचावले.

    अपघात कसा घडला याच्या शोधात पोलिस
    अपघातानंतर कंटेनरचा चालक फरार झाला असून त्याच्या शोधात पोलिस आहेत. तथापि, चालकाला झोपेची डुलकी आली असावी अथवा तो नशेत वाहन चालवत असावा या दोन कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चालकाला ताब्यात घेतल्यानंतरच नक्की कारण समजू शकेल, असे सहायक पोलिस निरीक्षक बी. एम. बोरसे यांनी सांिगतले.

    २२ वर्षांपासून ज्योत आणण्याची जपली परंपरा 
    सोळोळे येथील तुळजाभवानी मंडळाने २२ वर्षांपासून देवीच्या विविध प्रसिद्ध ठिकाणांहून ज्योत आणण्याची परंपरा जपली आहे. गतवर्षी कोल्हापूरहून ज्योत आणली होती. भगूर, कळसुबाई, मोहटा, सप्तशंृगी, जीवदानी आदी ठिकाणांहून यापूर्वी ज्योत आणली आहे. यंदा तुळजापूरहून ज्योत आणण्याचे ठरले. त्यानुसार ८ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता तुळजापूरहून ज्योत घेऊन ते निघाले होते.

    मुक्कामाचे ठिकाण अवघ्या अर्धा किलोमीटरवर
    दोन दिवस पायी ज्योत घेऊन थकल्याने नांदूरशिंगोटेत मुक्काम केला जाणार होता. त्यासाठी बायपासच्या खालून निमोण नाक्यावरील बोगद्याद्वारे ते नांदूरशिंगोटेत येणार होते. अर्धा किलोमीटर अंतरावरील रेणुकामाता मंदिरात मुक्काम होणार होता. तत्पूर्वीच अपघात घडला. सायखेड्याचे पोलिस निरीक्षक मोरे, वावीचे सहायक निरीक्षक बी. एन. बोरसे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. दोडी येथील १०८ रुग्णवाहिकेवरील तैनात डॉक्टर सतीश केदार, चालक कचरू बोडके यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. 
    याच कंटेनरने पायी ज्याेत घेऊन जाणाऱ्या भाविकांना चिरडले.
    जखमींची नावे 
    गोेरख तुकाराम डगळे, सुनील रामदास भोईर, समाधान मधू शिंदे, प्रकाश पांडू गुंड, गौरव संजय ढगे, हिरामण घोटे, रवी लहू भोईर, विनोद अशोक तांबडे, मच्छिंद्र लक्ष्मण भोईर, राजाराम लक्ष्मण आचारी, शंकर पोटिंदे, काळू शिंदे, दिलीप ठोंबरे यांच्यासह आणखी पाचजण जखमी झाले. कंटेनरने देवीभक्तांच्या ट्रकला (एम.एच. ०४, सीयू
    ३१९७), तीन दुचाकींनाही (एम.एच. १५ सीके १७२१, एम.एच. १५ जीडी ११८४, एम.एच. १५ एफसी ५८३६) जोराची धडक दिली. यातील जखमींचाही अठरा जणांत समावेशआहे 

Post a Comment

 
Top