स्पाल्डिंगः अमेरिकेतील जॉर्जिया येथे राहणा-या एका कपलच्या भांडणात त्यांच्या पाच महिन्यांचे बाळाचे शोषण झाले. जोडीदाराकडुन पैसे वसूल करण्यासाठी महिला त्याला ब्लॅकमेल करत होती. यासाठी तिने जोडीदारापासून तिला झालेल्या पाच महिन्यांच्या मुलीला टॉर्चर केले. मुलीचे डोके पाण्यात बुडवतानाचा व्हिडिओ बनवून या महिलेने फेसबुकच्या माध्यमातून मुलीच्या वडिलांना पाठला. महिलेचा हा कारनामा बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने जगाचा महिलेचा खरा दाखवण्यासाठी हा व्हिडिओ सार्वजनिक केला. या घटनेनंतर महिलेच्या तिन्ही मुलांची अथॉरिटी कस्टडीत आहे.
5 महिन्यांच्या मुलीसोबत क्रूरता..
- ही घटना स्पाल्डिंग काउंटी येथील आहे. येथे राहणारी 27 वर्षीय लिक्वांडा लेनिया मोसलीचा तिचा पार्टनर केविन बँक्ससोबत उदरनिर्वाहाच्या खर्चावरुन वाद सुरु होता.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोसलीने पैसे मिळत नसल्याने केविनला ब्लॅकमेल करायचे ठरवले. यासाठी तिने केविनपासून तिला झालेल्या पाच महिन्यांच्या मुलीचे डोके पाण्यात बुडवून तिला टॉर्चर केले आणि त्याचा व्हिडिओ बनवला.
- त्यानंतर मोसलीने हा व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमातून केविनपर्यंत पोहोचवला आणि तुला हेच हवे होते ना... असे लिहिले. त्यानंतर केविनने पोलिसांशी संपर्क साधून हा व्हिडिओ सार्वजनिक केला.
- केविनने व्हिडिओ पोस्ट करुन लिहिले, ''हे दृश्य बघून माझे हृदयच थांबले आणि माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले. कारण हे सर्व माझ्या चिमुकलीसोबत घडतं होतं.''पोलिस काय म्हणाले?- व्हिडिओ बघितल्यानंतर पोलिस अधिका-यांनी सांगितले की, मोसलीने ठरवून मुलीला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर आपली चुकही कबुल केली. पैशांसाठी तिने हे भयंकर कृत्य केले होते.
- मोसलीने दोन्ही मुलांना शाळेत पाठवल्यानंतर हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment