0
  • Vivek Tiwari Murder Case: What does the forensic report saysलखनौ - अॅपल मॅनेजर हत्याकांड प्रकरणात समोर आलेल्या फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) रिपोर्ट या घटनेची संपूर्ण कहाणीच पलटली आहे. रिपोर्टमध्ये हत्येचा मुख्य आरोपी काँस्टेबल प्रशांत चौधरीचा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे, की पीडित विवेकने त्याला कारने तीनदा चिरडण्याचा प्रयत्न केला होता. फॉरेन्सिक एक्सपर्ट्सनुसार, बाइकवरून उतरताच प्रशांतने पिस्तुल तानली असावी. त्यावरूनच घाबरलेल्या विवेकने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल. रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आले आहे, की गोळीबार झाल्यानंतर काँस्टेबलने बाइक आणि कारची तोडफोड केली.


    त्या रात्री घडले असे काही...
    - 28 सप्टेंबरच्या रात्री गोमतीनगर परिसरात अॅपल कंपनीचा मोबाईल लान्चिंग कार्यक्रम होता. तेथून परतताना अॅपलचा एरिया मॅनेजर विवेकचा मृत्यू झाला. 
    - फॉरेन्सिक टीमच्या एक्सपर्ट्सनुसार, काँस्टेबल प्रशांतने विवेकच्या कारपासून अडीच ते तीन किमी दूर बाइक थांबवली होती. 
    - यानंतर हातात पिस्तुल घेऊन थेट विवेकडे पोहोचला. परंतु, विवेकने कारची काच खाली उतरवली नाही. पिस्तुल पाहून विवेक घाबरला होता. याच भीतीने त्याने कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला. 
    - भीतीपोटी त्याने कारचे स्टिअरिंग पूर्णपणे फिरवले परंतु समोरच थांबलेल्या बाइकचा मागचा चाक बाइकला लागला आणि बाइक जमीनीवर कोसळली.

    विवेकला जाऊ देत नव्हता प्रशांत
    - फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, बाइकला कार धडकल्यानंतर विवेकने कार काहीशी मागे घेतली आणि पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशांत कारसमोर थांबला होता आणि तो विवेकला जाऊ देत नव्हता. 
    - प्रशांतने पिस्तुलने विवेकचा नेम धरला होता आणि त्याला अडवून ठेवले होते. यानंतर थेट विवेकच्या दिशेने गोळी झाडली. गोळी कारची विंडशील्ड चिरून थेट विवेकच्या हनुवटीला लागली. 
    - हत्याकांडातील एकमेव साक्षीदाराने सांगितले, की "पांढऱ्या अपाचे बाइकवर दोन पोलिस काँस्टेबल आमच्यासमोर आले. आणि कारसमोरच बाइक लावली. ते आम्हाला का अडवत होते याची काहीच माहिती नव्हती."
    - एक्स्पर्ट्सने सांगितल्याप्रमाणे, अतिशय जवळ असलेल्या प्रशांतने विवेकवर जी गोळी झाडली ती विवेकच्या हनुवटीपासून गळ्यातून आर-पार निघणार होती. परंतु, सुरुवातीला बुलेटला विन्डस्क्रीनचा सामना झाल्याने ती आरपार होऊ शकली नाही. तसेच हनुवटीपासून गळ्यात अडकली. 
    - प्रशांतकडे 9 एमएम पिस्तुल होती. या पिस्तुलातून 50 मीटरच्या रेंजवरून सहज अचूक निशाणा साधता येतो. या पिस्तुलाची फायरिंग रेंज कमाल 1800 मीटर आहे.

    गोंधळात पोलिसांनी सोडले पुरावे
    - या गोळीबाराला आत्मरक्षणाचे स्वरूप देण्यासाठी पोलिसांनी स्क्रिप्टिंगला सुरुवात केली. परंतु, याचवेळी त्यांच्याकडून काही चुका घडल्या. रिपोर्टनुसार, त्या रात्री घटनास्थळी असलेली बाइक कारच्या बंपरखाली असलेल्या सपोर्टरमध्ये अडकलेली दाखवण्यात आली.
    - परंतु, फॉरेन्सिक एक्सपर्ट्सनुसार, बंपरमध्ये बाइक अडकत असेल तर ती घसरत समोर गेलीच असेल. परंतु, घटनास्थळी कारखाली बाइक घसरून निघाल्याचे पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे, पोलिसांचा हा दावा फौल ठरला.
    - अर्थातच घटनेनंतर बाइकची तोडफोड करण्यात आली आहे. सोबतच पोलिसांनी विवेकच्या कारची देखील तोडफोड केली असे दिसून येते. पिलरला धडकल्यानंतरचे फोटो आणि दुसऱ्या दिवशी समोर आलेले फोटो यात फरक आहे.

Post a Comment

 
Top