0
  • जळगाव- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन होते. दरम्यान, नियोजन भवनात होत असलेल्या बैठकीला आमदारांना प्रवेश नाकारला आहे आमदार संजय सावकारे निघून गेले आहेत.
    विमानतळावर प्रशासनाच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, महानगरपा‍लिका आयुक्त चंद्रकांत डांगे आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्याचे फडणवीस यांचे स्वागत केले.
    आमदारांना प्रवेश नाकारला..संजय सावकारे परतले
    दरम्यान, नियोजन भवनात बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला आमदारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने आमदार संजय सावकारे परतले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पत्रकारांनाही प्रवेश देण्यात आलेला 

Post a Comment

 
Top