- नागपूर- "मला त्या मुलाचा आत्मा बोलावतोय..'अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या नागपुरातील एका 19 वर्षीय युवकाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सौरभ यशवंत नागपूरकर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.नागपुरातील कसाबपुरा तीन नळ चौकाजवळ राहणारा सौरभ हा प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. सौरभचे वडील एनसीसीमध्ये अधिकारी आहेत तर आई गृहिणी आहे. बहीण शिकत आहे. रविवारी चि
अपघात पाहिल्यापासून तणावात
कुटुंबीयांच्या चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपासून सौरभ तणावात होता. 2 महिन्यांपूर्वी त्याने एक रस्ता अपघात बघितला होता. त्यात एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. त्याचा सौरभला धक्का बसला होता. त्यामुळे तो रात्रीच्या वेळीही प्रचंड घाबरायचा. झोपेतून दचकून उठायचा. यादरम्यान त्याचाही एक छोटा अपघात झाला होता. "अपघातात मृत्युमुखी पडलेला मुलगा मला बोलावतोय..' असे तो सांगायचा. कदाचित याच धक्क्यात त्याने आत्महत्या केली असावी.
हा इम्परेटिव्ह हॅल्युसिनेशनचा प्रकार
सौरभला वेळीच मानसोपचार मिळाले असते तर ही घटना टाळता आली असती, असे मत नागपूरचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर "दिव्य मराठी'कडे व्यक्त केले. कोणताही धक्का बसला की व्यक्ती अॅक्युट स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये जाते. सामान्यपणे महिनाभरात मनाची ताकद असलेल्या व्यक्ती अशा धक्क्यातून बाहेर पडतात. मात्र, 12 ते 14 टक्के लोकांत मनाची कमकुवतता परिवर्तित होऊन ती व्यक्ती तणावात जाते. डिरियलायझेशनमध्ये ती व्यक्ती स्वत:चे अस्तित्व विसरतो. जागेपणीही त्याला भास होतात. या प्रकाराला "मायक्रो सायकोटिक एपिसोड' अथवा "इम्परेटिव्ह हॅल्युसिनेशन' असेही म्हणतात.रात्री कुटुंबातील लोक नातेवाइकाकडे गेल्यामुळे सौरभ आणि त्याची बहीण असे दोघेच घरी होते. सौरभ अभ्यासाच्या निमित्ताने खोलीत होता. तेथे त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आई-वडील घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळावर पोहोचल्यावर त्यांना सौरभच्या शर्टाच्या खिशात - ठ्ठी सापडली. त्यात त्याने "आपला भुतांवर विश्वास नाही. मात्र, मला आत्मा बोलावत असल्याने मी जातो आहे..' असे लिहून ठेवले होते.
नागपूर- "मला त्या मुलाचा आत्मा बोलावतोय..'अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या नागपुरातील एका 19 वर्षीय युवकाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सौरभ यशवंत नागपूरकर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
नागपुरातील कसाबपुरा तीन नळ चौकाजवळ राहणारा सौरभ हा प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. सौरभचे वडील एनसीसीमध्ये अधिकारी आहेत तर आई गृहिणी आहे. बहीण शिकत आहे. रविवारी रात्री कुटुंबातील लोक नातेवाइकाकडे गेल्यामुळे सौरभ आणि त्याची बहीण असे दोघेच घरी होते. सौरभ अभ्यासाच्या निमित्ताने खोलीत होता. तेथे त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आई-वडील घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळावर पोहोचल्यावर त्यांना सौरभच्या शर्टाच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात त्याने "आपला भुतांवर विश्वास नाही. मात्र, मला आत्मा बोलावत असल्याने मी जातो आहे..' असे लिहून ठेवले होते.
अपघात पाहिल्यापासून तणावात
कुटुंबीयांच्या चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपासून सौरभ तणावात होता. 2 महिन्यांपूर्वी त्याने एक रस्ता अपघात बघितला होता. त्यात एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. त्याचा सौरभला धक्का बसला होता. त्यामुळे तो रात्रीच्या वेळीही प्रचंड घाबरायचा. झोपेतून दचकून उठायचा. यादरम्यान त्याचाही एक छोटा अपघात झाला होता. "अपघातात मृत्युमुखी पडलेला मुलगा मला बोलावतोय..' असे तो सांगायचा. कदाचित याच धक्क्यात त्याने आत्महत्या केली असावी.
हा इम्परेटिव्ह हॅल्युसिनेशनचा प्रकार
सौरभला वेळीच मानसोपचार मिळाले असते तर ही घटना टाळता आली असती, असे मत नागपूरचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर "दिव्य मराठी'कडे व्यक्त केले. कोणताही धक्का बसला की व्यक्ती अॅक्युट स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये जाते. सामान्यपणे महिनाभरात मनाची ताकद असलेल्या व्यक्ती अशा धक्क्यातून बाहेर पडतात. मात्र, 12 ते 14 टक्के लोकांत मनाची कमकुवतता परिवर्तित होऊन ती व्यक्ती तणावात जाते. डिरियलायझेशनमध्ये ती व्यक्ती स्वत:चे अस्तित्व विसरतो. जागेपणीही त्याला भास होतात. या प्रकाराला "मायक्रो सायकोटिक एपिसोड' अथवा "इम्परेटिव्ह हॅल्युसिनेशन' असेही म्हणतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment