नेवासे- नेवासा पोलिस स्टेशनचे न्यायालयीन कोठडीचे कारागृहाची भिंत फोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना नेवासे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. निवारे यांनी दोन वर्षांची कैदेची शिक्षा दिली आहे.
राजीव गांधी झोपडपट्टी कर्जत येथील देविदास दिव्या भोसले वय वर्षे साठ व त्याची मुले नुरा देविदास भोसले वय वर्षे २७ आणि नवनाथ ऊर्फ अंड्या देविदास भोसले वय वर्षे २५ या तिघांना नेवासे पोलिसांनी विवेकानंद नगर कॉलनीमधील सोनवणे हत्या कांडप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांना नेवासे येथील कारागृहाच्या ४ खोल्यांपैकी न्यायालयीन कोठडीतील कैदी ठेवण्याच्या पूर्वेकडून पहिल्या खोलीत न्यायालयीन पोलिस कोठडीमध्ये ठेवले असता दिनांक १६ मार्च रोजी रात्री बारा ते साडेतीन वाजेच्या दरम्यान वाजेच्या दरम्यान या तिघांनी लोखंडी पट्टीच्या साह्याने कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीचे बाजूने संडासच्या वरील बाजूस सिमेंट काढून बोगदा करण्याचा प्रयत्न केला कारागृहाची भिंत फोडून फोडून ते पळून जाणार होते.
पहाटे पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर याप्रकरणी सहायक पोलिस िनरीक्षक एच. डी. भोईटे यांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला होता. नेवासे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी निवारे यांनी सरकारी वकील श्यामराव देशपांडे व एन. एन. पवार यांचा युक्तिवाद ऐकून घेतला व आरोपींना दोन वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी प्रभारी निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहनराव शिंदे, हेड कॉन्स्टेबल रेवणनाथ मरकड, मुस्तफा शेख, एस. जी. हजारे यांनी मदत केली.
Post a Comment