0
महाराष्ट्रा एक्सप्रेसस  न्यूज 
      • मुंबई- जगभरात नोकरीचे कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांची कमतरता असल्याने आणि राज्यातील तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यावर त्वरित नोकरी मिळावी म्हणून राज्य सरकारने कौशल्य विकास आधारित ५५० महाविद्यालये पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याची योजना आखली आहे. याबाबतची जाहिरात लवकरच काढली जाणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक जगाबरोबर राहता यावे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स व उत्पादन डिझाइनमधील प्लेसमेंट आधारित अभ्यासक्रमही सरकार सुरू करणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी "दिव्य मराठी'शी बाेलताना दिली.


        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (माहेड) ची नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत नव्या महाविद्यालयांचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही महाविद्यालये गैर-कृषी असतील. विज्ञान, वाणिज्य, कला, अभियांत्रिकी असे अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांत न शिकवले जाणारे विषय या महाविद्यालयांना शिकवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना पूर्णपणे कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम देण्यात येणार असू
        न यात मरीन इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्ट अशा वेगळा विषयांचा समावेश आहे. ५५० पैकी ६० महाविद्यालये मुंबई विद्यापीठातच स्थापन केली जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अशा महाविद्यालयांसाठी जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. काही महाविद्यालये ही फक्त मुलींसाठी असतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली. यासाठी इच्छुकांनी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज अॅक्टनुसार, ऑफर देण्याच्या कोर्सनुसार योजना तयार करणे आणि नवीन स्लॉट प्रस्तावित करणे आवश्यक आहे. त्यानंतर जाहिरात आल्यानंतर प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

        कंपन्यांचा प्रशिक्षणासाठीचा वेळ वाचेल 
        राज्य सरकारने अभियांत्रिकीसाठी सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (अार्टिफिशियल इंटेलिजन्स) , रोबोटिक्स व उत्पादन डिझाइनमधील प्लेसमेंटवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाविद्यालयांना मदतही केली जाईल. स्वायत्त महाविद्यालये हे अभ्यासक्रम वैकल्पिक म्हणून तर इतर महाविद्यालये मूल्यवर्धित अभ्यासक्रम म्हणून यांचा समावेश करू शकतात. यामुळे कंपन्यांना इंटर्न म्हणून विद्यार्थी घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचा वेळ वाचेल. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाचा युवक-युवतींना मोठा फायदा होईल.

        असे असेल प्रशिक्षण 
        द्वितीय आणि तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित अभ्यासक्रम पर्याय म्हणून देण्यात येईल. त्यांना एकूण ७० ते ३०० तासांचा अभ्यास करावा लागेल. शिवाय, राज्य सरकार औषधनिर्माण व अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करेल. संगणक विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना तासांचा एआय अभ्यासक्रम शिकवला जाईल.

    Post a Comment

     
    Top