नवी दिल्ली - एअरसेल-मॅक्सिस मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध गुरुवारी पातियाळा हाऊस कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात चिदंबरम यांना आरोपी क्रमांक 1 दाखवले आहे. ईडीने म्हटले आहे की, चिदंबरम यांनी विदेशी कंपनीला गुंतवणुकीस मंजुरी देण्याच्या नावावर कट रचला होता. आपल्याकडे चिदंबरम यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे आहेत.
पुरवणी आरोपपत्रात चिदंबरम यांचे पुत्र कार्तीचे सीए भास्कररमनसह इतर आठ जणांची नावे आहेत. विशेष न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणीसाठी 26 नोव्हेंबरची तारीख मुक्रर केली आहे. या प्रकरणात सीबीआयने यावर्षी जुलैत स्वतंत्रपणे एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलेले आहे. आता यात एकूण आरोपींची संख्या 18 वर पोहोचली आहे. प्रकरणात कार्ती चिदंबरम हे आधीपासूनच आरोपी आहेत.अर्थमंत्री असताना आरोपी कंपनीला एफआयबीपीची मंजुरी दिली3,560 कोटींचा एअरसेल-मॅक्सिस करार व 350 कोटींच्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात ईडी व सीबीआय पी. चिदंबरम यांच्या भूमिकेची तपासणी करत आहेत. या प्रकरणात माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन, कलानिधी मारन आणि इतरांविरुद्ध आधी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयच्या आरोपानुसार, मार्च 2006 मध्ये अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी मॉरिशसच्या ग्लोबल कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस होल्डिंग्ज लिमिटेडला एफआयबीपीची मंजुरी दिली होती.चिदंबरम यांना महिनाभर अटक नाही
दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेवरील मनाईची मुदत आता २९ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. हायकोर्टाने गुरुवारी चिदंबरम यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना ईडीला निर्देश दिले की, २९ नोव्हेंबरपर्यंत चिदंबरम यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नये. ईडीने चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment