पुणे- पुढील दोन दिवसांत गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत हलक्या पावसाची शक्यता असून या काळात मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उमरगा शहरात तिसऱ्यांदा अतिवृष्टी, वादळी वाऱ्याने पिके भुईसपाट झाली. येथे बुधवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचा जबर फटका उसासह भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. उमरगा शहरात बुधवारी रात्री ८१ मिमी पाऊस झाला. तालुक्यातील मुरूम येथे २१, तर डाळिंबला २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भूम तालुक्यातील पाटसांगवी परिसरात वादळी वाऱ्यामुळे वांगे व कारल्याचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यात दिवसभर विविध भागात वादळी वारे असले तरी पावसाने मात्र कुठेही दमदार हजेरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment