0
  • लखनौ - उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातून एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचा नागरिक असलेला मायकल बोजेर गेल्या वर्षभरापासून एका महिलेचे लैंगिक शोषण करत होता. लग्नाचे अमीष देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्या महिलेने गर्भवती झाल्याचे सांगितले तेव्हा तिच्यावर अमानवीय अत्याचार सुरू केले. 25 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिस मायकलला अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याने तूफान राडा केला. पोलिसांना चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ करत धक्काबुक्की सुद्धा केली. चाकू दाखवून तो मला शूट करा असे पोलिसांना सांगत होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

    फेसबूकवरून झाली होती मैत्री
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने दिल्लीतील एका महिलेचे शोषण केले आणि तिला सोडून 4 ऑक्टोबरपासून तो मथुरा येथे राहत होता. कायद्यानुसार, त्याने पोलिसांत आपल्या भारतात असण्याची अधिकृत माहिती देणे आवश्यक होते. तरीही त्याने त्यावर दुर्लक्ष केले. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय दंड विधनाच्या कलम 376, 307, 332, 353, 323 आणि फॉरेनर्स अॅक्टच्या कलम 14 नुसार आरोप दाखल करण्यात आले आहेत. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची 2017 मध्ये फेसबूकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. याच दरम्यान त्याने लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु, गर्भधारणा झाल्याचे वृत्त समोर येताच तिला मारहाण करण्यास सुरुवात केली

Post a Comment

 
Top