0
भारताचा दुसरा एकदिवसीय सामना उद्या विशाखापट्टणम येथे होत आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर आठ विकेट आणि आठ षटके राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विराटने या सामन्यात आपले ६० वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले याचबरोबर त्याने सचिनच्या शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गातला मोठा टप्पा पार केला. पण, पहिल्या सामन्यात दिड शतकी खेळी करणारा रोहित शर्माही सचिनचे एक रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. पहिल्या सामन्यात रोहितने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा १५० धावा करण्याचे सचिनचे (५) रेकॉर्डही मोडले होते. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात नाबाद १५१ धावांची तुफानी खेळी केली. पहिल्या पॉवर प्लेपर्यंत शांत असलेल्या रोहिने पॉवर प्ले संपल्यानंतर चौकार आणि षटकारांची आतशबाजी सुरु केली. त्याने आपल्या नाबाद १५१ धावांच्या खेळीत १५ चौकार आणि तब्बल ८ षटकार खेचले. या सामन्यात त्याने एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जास्त षटकार मारण्याच्या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीलाही मागे टाकले. त्याने गांगुलीचे १९० षटकार मारण्याचे रेकॉर्ड मोडले. रोहितचे एकदिवसीय सामन्यामध्ये आता १९४ षटकार झाले आहेत. तो सचिनचे १९५ षटकारांचे रेकॉर्ड मोडण्याच्या फक्त एक षटकार मागे आहे. सध्याचा त्याचा फॉंर्म पाहता तो उद्याच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हे रेकॉर्ड मोडेल. 

एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात २१७ षटकार मारले आहेत. हा यादीत सर्वोच्च स्थानावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात ३५१ षटकार मारले आहेत. 

Post a Comment

 
Top