अमृतसर - पंजाबच्या जोडा रेल्वे फाटकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात देशभर शोककळा पसरली आहे. दसऱ्याचा उत्सव साजरे करण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना आपल्या मित्र-परिवारांचे मृतदेह शोधण्याची वेळ आली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रुळावरून जाणाऱ्या भरधाव रेल्वेने हॉर्न सुद्धा वाजवले होते. परंतु, रावण दहन सुरू झाल्याने त्या फटक्यांच्या आवाजात ट्रेनचा आवाज दबला. लोकांनी ट्रेन दिसली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विशेष म्हणजे, त्या रुळावरून एक नव्हे तर दोन ट्रेन गेल्या होत्या. अपघातानंतरचे दृश्य इतके भयंकर होते की लोक आपलेच हात आणि आपलेच पाय शोधत होते. तर काही मृतदेहांवर शिरच नव्हते.

Post a Comment