0
सातारा : शहरातील माची दगड परिसरात पतीने पत्नीच्या डोक्यात नारळ सोलण्याची पार मारून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. वैशाली धनंजय खोत (वय ३९, रा. शनिवार पेठ, सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. चारित्र्याचा संशय व पैशांच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर खून करून पती धनंजय दगडू खोत (वय ५०) पसार झाला आहे.
याबाबत मुलगी सृष्टी धनंजय खोत (वय १७) हिने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून खोत कुटुंबीय शंकराचार्य मठाजवळ शनिवार पेठेत राहत आहे. तिचे वडील धनंजय दगडू खोत (वय ५०) हे रिक्षा चालकाचे काम करीत होते. त्यांचे उत्पन्न तुटपुंजे असल्याने आई वैशाली शिवणकाम व पिठाची गिरणी चालवत होत्या. धनंजय नेहमी वैशाली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तसेच पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.

Post a Comment

 
Top