0
  • पुणे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीकडे निघाल्या होत्या. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याविषयी त्यांना नरेंद्र मोदींशी चर्चा करायची होती. मात्र त्यापुर्वी पुणे पोलिसांनी तृप्ती देसाई यांना अटक केली आहे.

    तृप्ती देसाई यांनी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पत्र लिहून मागणी केली होती. शबरीमाला मंदिर महिलांच्या दर्शन प्रकरणी मला नरेंद्र मोदींची भेट घ्यायची आहे असे त्यांनी या पत्रात लिहिले होते. पंतप्रधानांना भेटू दिले नाही तर त्यांचा ताफा अडवून त्यांना भेटू अशी धमकीही त्यांनी दिली होती. पण यापुर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले 
    अशी होती तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया
    आम्ही शिर्डीला निघणार होतो. त्याआधीच पोलीस इथे पोहोचले. हे चुकीचे आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आम्हाला घरीच थांबवण्यात आले. मोदींकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या
    .
  • आहे.

Post a Comment

 
Top