- अजमेर - राजस्थानातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि वसुंधरा राजे सरकारमधील मंत्री शंभू सिंह उघड्यावर लघुशंका केल्याने सोशल मीडियात ट्रोल झाले आहेत. ते ज्याठिकाणी युरिन करत होते त्याठिकाणी समोर वसुंधरा राजे सरकारचे पोस्टर होते, तर काही अंतरावरच मोदींची सभा झाली होती. पण मिनिस्टर महोदयांना मात्र यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही.
शंभू सिंह यांचा उघड्यावर लघुशंका करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. यूजर्सने या फोटोच्या माध्यमातून मोदींच्या 'स्वच्छ भारत मिशन'मध्ये त्यांच्याच नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. शंभू सिंहने स्पष्टीकरण दिले की, उघड्यावर शौच केल्याने अनेक आजार होऊ शकतात, पण लघुशंका केल्याने घाण होत नाही. जवळपास लघुशंका करण्याची व्यवस्था नव्हती असेही ते म्हणाले. -
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment