0
 • Sexually Abusing Minor Students in Yawal Jalgaonयावल- नारी शक्तीचा जागर करणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी 35 वर्षीय नराधमाने मुलीच्या मैत्रिणीसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जुबरे शेख लाल असे आरोपीचे नाव असून पीडिता ही त्याच्या मुलीची मैत्रिण आहे.

  मिळालेली माहिती अशी की, शहरातील बाबानगरमधील राहाणारी पीडिता सोमवारी (ता.8) त्याच भागात असलेल्या शेख जुबरे शेख लाल यांच्या किराणा दुकानावर गेली होती. तिच्यासोबत तिचा चुलत भावाही होता. दुकान परिसरात कोणी रस्त्यावर नसल्याचा फायदा घेत नराधमाने पीडीत मुलगी आणि तिच्या चुलत भावाला दुचाकीवर बसवून बंद सुतगिरणी परिसरात नेले. तिथे मुलीसोबत अश्लील कृत्य केले. तिच्यावर अत्याचार करण्‍याचाही प्रयत्न केला. पीडिता आणि तिचा भाऊ रडू लागल्याने आरोपीने दोघांना दुचाकीवर बसवून काही अंतरावर सोडून दिले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुमची खैर नाही, असा दोघांना नराधमाने दमही दिला. पीडित मुलीने घरी आल्यानंतर आई-बाबांना हा प्रकार सां‍गितला. पीडीत मुलीसह तिच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. आरोपीविरोधात बालक लैंगिक कृत्ये संरक्षण कायदा 2012 (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
  पुढील तपास पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलिस उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, संजय तायडे करीत आहे.
  इन कॅमेरा जवाब नोंदवला...
  दरम्यान, पीडीताचा जबाब इन कॉमेरा नोंदविण्‍यात आला. यावेळी पोलिस उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, पीडीताची आजी व महिला दक्षता समितीच्या सदस्या द्रोपदाबाई झांबरे उपस्थित होत्या.
  ..

Post a Comment

 
Top