0
नागपूर- एकतर्फी प्रेमाच्या प्रकरणातून युवकाने युवतीच्या अंगावर कार नेऊन तिला ठार मारल्याची घटना नागपुरात शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. पोलिसांनी अनिकेत साळवे नामक आरोपीस अटक केली. त्याचे तीन साथीदार फरार आहेत.
  • अनिकेतचे त्याच्या घराजवळील मयूरी हिंगणेकर या तरुणीशी एकतर्फी प्रेमसंबंध होते. तो सारखा तिच्या मागे लागला होता. मयूरी सातत्याने त्याला नकार देत होती. त्यामुळे संतापलेल्या अनिकेतने तिचा काटा काढण्याचे ठरवले. शनिवारी मयूरी तिचा मित्र अक्षय नगरधनेच्या दुचाकीवर बसून बाहेर गेली होती. रात्री ती त्याच्यासह परतत असताना गांधीसागर तलावाजवळ अनिकेत व त्याच्या मित्रांनी भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी होऊन मयूरी मृत्युमुखी पडली तर तिचा मित्र अक्षय हा जखमी झाला. रविवारी तिच्या नातेवाइकांनी दिलेली तक्रार आणि अक्षयच्या जबाबावरून पोलिसांनी रविवारी सायंकाळी अनिकेत व त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अनिकेतला अटक झाली असून त्याचे मित्र फरार आहेत.

    अनिकेतचे त्याच्या घराजवळील मयूरी हिंगणेकर या तरुणीशी एकतर्फी प्रेमसंबंध होते. तो सारखा तिच्या मागे लागला होता.

    • murder of girl in one side love

Post a Comment

 
Top