0
 • एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने सोमवारी वयाची 48 वर्षे पूर्ण केली. गौरीने तिच्या काही फ्रेंड्ससोबत आपला वाढदिवस साजरा केला. बर्थडे सेलिब्रेशनचे जे निवडक फोटोज समोर आले आहेत, त्यात गौरी अतिशय नाराज दिसत आहे. गौरी फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीवर चिडताना दिसतेय. पण ती नेमकी कुणावर आणि कशामुळे नाराज झाली, याची माहिती मिळू शकली नाही.

  शाहरुख, सुहाना किंवा आर्यन कुणीच नव्हते सोबत...
  - गौरीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये तिच्या कुटुंबातून फक्त तिचा लहान मुलगा अबराम सहभागी झाला होता. यावेळी शाहरुख खान किंवा त्यांची मुले सुहाना आणि आर्यन दिसले नाहीत.
  - वाढदिवशी गौरी खान लाँग स्कर्ट आणि चेक शर्टमध्ये दिसली. ज्यावेळी तिचे फोटो क्लिक झाले, तेव्हा ती फोनवर बोलताना अतिशयरागात होती.
  - गौरी स्टार वाइफ असण्यासोबतच निर्माती आणि इंटेरिअर डिझायनर आहे. शाहरुख त्याच्या यशाचे संपूर्ण श्रेय पत्नी गौरीला देत असतो.
  दोनदा झाले होते लग्न...
  शाहरुख आणि गौरी लग्नासाठी तयार होते, पण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने गौरीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. शाहरुखला गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले होते. अखेर त्याला यश मिळाले. गौरीच्या आईवडिलांनी लग्नाला त्यांचा होकार दिला. त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन पद्धतीने शाहरुख-गौरीचे लग्न झाले होते. निकाहच्या वेळी गौरीचे नाव आयशा ठेवण्यात आले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 1991 रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या संगीत सेरेमनीत शाहरुख-गौरी यांनी ताल धरला होता.Shahrukh Khan Wife Get Angry On Her Birthday Celebration

Post a Comment

 
Top