0
कर्नाटकसह महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे आराध्य वसगडे (ता. करवीर) गावचे ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा रविवार 28 पासून सुरु होत असून यात्रेनिमित्त शुक्रवार 2 पर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार यात्रेचा मुख्य दिवस असुन सकाळी साडेआकरा वाजता फरांडेबाबा आबादेव वायकुळे यांची भाकणूक होणार आहे. सायंकाळी ऊस गाडय़ांची मिरवणूक, श्री पालखी तसेच करमणुकीचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सोमवारी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त भाविकांसाठी सोयीची जय्यत तयारी झाली असून धार्मिक कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटी यांनी केले आहे

Post a Comment

 
Top