0
  • पुणे- सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर मदत करण्याच्या बहाण्याने उबेर आणि ओेला कारच्या चालकासह तिघांनी चार दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आर्इने आळंदी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

   विजय हनुमंत ननवरे (30, भोसरी,पुणे) व अब्दुल अहमद शेख (33, दिघी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित ही खेड तालुक्यातील सोळू गावची रहिवासी असून 11 सप्टेंबर रोजी तिचे सावत्र आईशी वाद झाले. मात्र, रागाच्या भरात ती घरातून निघून गेली. कुटुंबीयानी तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने त्यांनी आळंदी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील यमुनानगर येथे अशाच प्रकारे एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. निगडी पोलिस तिचा शोध घेत असतानाच त्यांना आळंदी पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झालेली 17 वर्षीय मुलगी सापडली. दरम्यान, पोलिसांनी तिची विचारपूस केली, पण मानसिक स्थिती चांगली नसल्याने ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिला कुटुंबीयाच्या हवाली देत तिच्याकडे विचारपूस करण्यास सांगितले.

   मदतीच्या बहाण्याने केला बलात्कार 
   कुटुंबीयांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडितेने सांगितले, 11 सप्टेंबर रोजी घर सोडल्यानंतर ती पायी चालत विश्रांतवाडी येथे गेली. तिथे फिरत असताना रामचंद्र नावाचा ओला कारचालक तिला भेटला. त्याने मदत करण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिला चंदननगरातील लॉजवर नेले. तिथे बलात्कार करून दुसऱ्या दिवशी विमाननगरमध्ये तिला सोडून दिले. विमाननगरमध्ये उबेर कारचालक अब्दुल शेख तिला भेटला. त्याने चौकशी केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. भोसरीतील आपला मित्र विजय ननावरेच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने तू त्याच्या घरी राहा, असे त्याने पीडितेला सांगत विजयच्या घरी नेऊन सोडले. मात्र, तिच्या असहायतेचा फायदा घेत 12 व 13 सप्टेंबर विजयनेही तिच्यावर बलात्कार केला. 14 सप्टेंबरला शेख तिथे आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर विजयला घराबाहेर ठेवत अब्दुलनेही तिच्यावर अत्याचार केला.

   सोळू गावची रहिवासी असून 11 सप्टेंबर रोजी तिचे सावत्र आईशी वाद झाले.

   • Minor Girl Raped in Pune by Ola, Uber Cab Driver

Post a Comment

 
Top