0


मुंबई : देशातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला ‘खो’ मिळत असल्याचे वास्तव उजेडात येत आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या दिवाळी विशेष वाहतुकीसाठी महामंडळाच्या विशेष फेऱ्या ‘आॅनलाइन’ उपलब्ध नाहीत. महामंडळाचे ‘अ‍ॅप’ आणि अधिकृत ‘संकेतस्थळा’वरूनदेखील एसटीचे तिकीट बुकिंग होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दिवाळी विशेष जादा वाहतुकीसाठी १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत नियंत्रण समितीने मंजुरी दिली आहे. मंजुरी दिलेल्या सर्व फेºया संगणकीय आगाऊ आरक्षणासाठी त्वरित उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे वाहतूक शाखेचे आदेश आहेत. विशेष म्हणजे, या दिवाळी विशेष फेºया संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध आहेत की नाहीत? याची तपासणी मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

महामंडळाच्या अधिकृत अ‍ॅपमधून दिवाळी विशेष मुंबई-धुळे साधी एसटीचे आरक्षण तपासले असता, या प्रकारची कोणतीही गाडी उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. महामंडळाच्या सुमारे ८० टक्क्यांहून अधिक दिवाळी विशेष फेºया मोबाइल अ‍ॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने प्रवाशांना संबंधित आगार आणि स्थानकांवरील तिकीट खिडकीच्या रांगेत ताटकळत राहून आरक्षण करावे लागत आहे. मुंबई सेंट्रलसह अन्य तिकीट खिडक्यांवरील कर्मचारी त्यांच्या ‘सोई’ने काम करत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एसटी महामंडळाने ५ आॅक्टोबर रोजी ९ हजार ३२० दिवाळी विशेष फेºया चालविण्याची घोषणा केली. या विशेष फेºया १ नोव्हेंबरपासून मार्गस्थ होतील. विशेष फेºयांसाठी महामंडळाने तिकीट दरांत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. महागाईच्या भडक्यात होरपळणाºया प्रवाशांना भाडेवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यात किमान रांगेच्या जाचातून सुटका व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
'Break' from ST Corporation for 'Digital India' initiative | ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला एसटी महामंडळाकडून ‘ब्रेक’

आयटीचे काम सुरू
दिवाळी विशेष फेऱ्या आॅनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, काही फेºया आॅनलाइन दिसत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार महामंडळातील आयटी टीमचे काम सुरू आहे. लवकरच सर्व वाहनांचे आरक्षण आॅनलाइन करता येणार असल्याचे एसटी महामंडळाचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक रा.रा. पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top