0
 • Declaration of drought in Marathwada till the end of Decemberलातूर- राज्यात या वर्षी ७७ टक्के पाऊस पडला. मराठवाड्यात तर कुठे ७० टक्के तर कुठे त्याहीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे टंचाईची स्थिती आहे. याचे पंचनामे सुरू करून डिसेंबरअखेरपर्यंत चित्र स्पष्ट झाले की टंचाईची घोषणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर केले. टंचाई स्थितीच्या घोषणेनंतर केंद्रीय पथक बोलावून त्यांचा पाहणी अहवाल आला की दुष्काळाची घोषणाही करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.


  लातूर येथे रविवारी महाआरोग्य मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. दोन वर्षांत मराठवाड्यात चांगला पाऊस पडला. सरकारने जलयुक्त शिवारची कामे केली. त्यामुळे राज्यात सर्वत्र भूजल पातळी उंचावली. परंतु निसर्ग काम करणाऱ्यांचीच परीक्षा घेतो. यावर्षी पुन्हा एकदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे पंचनामे झाले की ३१ डिसेंबरपर्यंत टंचाई स्थितीची घोषणा केली जाईल. यानंतर नियमानुसार केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल. त्यानंतर दुष्काळाची घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  या वेळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, खा. सुनील गायकवाड यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या शिबीराचा उद्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविकात सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबीर समन्वयक रामेश्वर नाईक यांनी करून शेवटी आभार मानले.

  फडणवीस म्हणाले
  - राज्यातील ९० टक्के लोकांना आरोग्याची समस्या. 
  - केवळ गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीयांसमोरही आरोग्याच्या समस्या उभ्या टाकल्या की त्यांची आर्थिक कोंडी होते.
  - आयुष्यमान योजनेमुळे कुणालाही आरोग्य सेवेअभावी देशात आता जीव गमवावा लागणार नाही.

  यानंतरचा मुख्यमंत्री पण मीच असेन...
  लातूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सेवांचे विस्तारीकरण, उपकरणांसाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी निधी मागितला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींची मदत तीन टप्प्यांत देण्याची घोषणा केली. पहिला टप्पा अर्थसंकल्पापूर्वी, दुसरा अर्थसंकल्पानंतर व तिसरा टप्पा पुढील वर्षी देऊ असे ते म्हणाले. काही म्हणतील तुमचा कार्यकाळ तर पुढच्या वर्षी संपेल. त्यांना मी सांगू इच्छितो की, यापुढील काळातही मीच मुख्यमंत्री राहणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

  लातूर वैद्यकीय महाविद्यालयास तीन टप्प्यांत १०० कोटी
  रुग्णांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी लातूर वैद्यकीय महाविद्यालयास तीन टप्प्यांत १०० कोटी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. तसेच जिल्हा रुग्णालयासाठी महिनाभरात जागा दिली जाईल, असेही ते म्हणाले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने रविवारी आयोजित विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

  १० लाख बेघरांना घरे...
  राज्यात १२ लाख बेघरांपैकी १० लाख लोकांना २०१९ पर्यंत घरकुले दिली जातील. उर्वरित दोन लाख लोकांच्या नवीन याद्यांना मंजुरी देऊन त्यांनाही घरकुल देऊन राज्यात कोणीही घरापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ, असे ते म्हणाले.

  साडेतीन वर्षांत शेतकऱ्यांना सरकारने भरभरून दिले
  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या काळात ७ हजार कोटींची मदत मिळाली होती. साडेतीन वर्षांतच आम्ही २२ हजार कोटींची मदत दिली. मागील सरकारने ४ हजार कोटी कर्जमाफी दिली. आमच्या काळात २२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. हमीभाव नसल्याने १५ वर्षांत ४५० कोटींचाच शेतीमाल खरेदी झाला. आमच्या काळात ही खरेदी ८.५ हजार कोटींची आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी
   

Post a comment

 
Top