0
येथील शिवराज महाविद्यालयाच्या वतीने जडीयेसिध्देश्वर बेलबाग येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय मुलांच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पेठवडगावच्या व्ही. वाय. कॉलेजने विजेतेपद पटकावले आहे. विजेत्यांना संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते पदक देवून गौरविण्यात आले. यावेळी परिसरातील मान्यवर पंचांचाही सत्कार झाला.
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हय़ातील 200 हून अधिक कुस्तीपट्टू यात सहभागी झाले होते. विविध वजनी गटात या स्पर्धा झाल्या. ग्रीकोरोमन कुस्ती (सर्व क्रमांक प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)-  130 किलो -सुशांत जाधव (कोल्हापूर), शंकर चौगुले (कोल्हापूर), उदय खांडेकर (सांगली). 97 किलो – रोहन राणडे (मुरगूड), अभिषेक देवकर (विटा), सुधीर कुरळे (गडहिंग्लज). 87 किलो – तानाजी विरकर (म्हसवड), सतिश आडसुळ (गारगोटी), सागर जाधव (कडेपूर). 82 किलो – अंकुष माने (पेठवडगाव), शहारूख मुल्लाणी (कोल्हापूर), प्रथमेश थोरात (सावळस). 77 किलो – विपूल गुंडगे (फलटण), अक्षय मोहिते (सातारा), ऋतुराज मासाळ (तिसंगी). 72 किलो – सचिन खोत (सलगरे), महेश गवळी (मिरज), प्रदिप पाटील (चिखली). 67 किलो – योगेश पाटील (पनोरे), आशिष घाटगे (फलटण), प्रतिक बागडी (सांगली). 63 किलो – शुभम कोंडेकर (मुरगूड), मयुर जाधव (कापशी), शिवतेज रेणुशे (कळे). 55 किलो – नितिन कांबळे (कुरूकली), नाथा पोवार (खानापूर), गणेश वाघ असे आहेत.
फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील विजेते असे 125 किलो – ज्ञानेश्वर किसवे (पेठवडगाव), रामचंद्र शिंदे (कवठेमहांकाळ), संघर्ष पवार (वारणा). 97 किलो – वैभव रासकर (पेठवडगाव), अरुण बोंगार्डे (कोल्हापूर), प्रतिक पाटील (उंद्रळे). 92 किलो – मोहन पाटील (कळे), विक्रम शेटे (इचलकरंजी), आण्णा यमगर (खानापूर). 79 किलो – भैरू माने (पेठवडगाव), शशिकांत बोंगार्डे (कोल्हापूर), वैभव बंडगर (म्हसवड) 74 किलो – विशाल राजबे (सातारा), कुमार दडस (फलटण), साहिल कणसे (रेहमतपूर). 70 किलो – विशाल कोकरे (सातारा), वैभव पाटील (पेठवडगाव), 65 किलो – सुमित गुजर (वाघोली), वैभव यादव (बिद्री), राकेश भोकरे (कोल्हापूर), 61 किलो – सौरभ पाटील (भोगावती), प्रविण चोरमळे (कोल्हापूर), मिलींद मिसाळ (सातारा). 57 किलो – ओंकार लाड (राधानगरी), शिवराज कणसे, अक्षय चव्हाण (वाई) असे आहेत.
विद्यापीठ निवड समितीचे चेअरमन प्रा. बाजीराव पाटील, प्रा. दिलिप पवार, प्रा. भाऊसाहेब पाटील, प्रा. के. आर. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. पंच म्हणून संभाजी वरूटे, संभाजी पाटील, बबन चौगुले, राजाराम चौगुले, दादू चौगुले, बापू लोखंडे, कृष्णात पाटील, तानाजी पाटील, बाबा शिरगावकर, संदिप पाटील, प्रकाश खोत, सिकंदर कांबळे यांनी काम पाहिले. प्राचार्य डॉ. आर. बी. तेली, सचिव प्रा. अनिल कुराडे, ऍड. दिग्वीजय कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज महाविद्यालचे क्रिडा विभाग प्रमुख प्रा. राहूल मगदूम, प्रा. जयवंत पाटील, प्रकाश पोवार, शंकर कुरळे, रविंद्र डोंगरे, अशोक कदम, प्रकाश धबाले, विठ्ठल भम्मानगोळ, सागर शिंदे, उमेश रामजी, प्रभाकर खांडेकर, विश्वास खोत यांच्यासह गडहिंग्लज, लिंगनूर, नूल, मुत्नाळ, कडगाव येथील तालिम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

 
Top