0
 • 100 husbands did pindadan of live wifeनाशिक- विवाहित पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारातून मुक्ती मिळावी... आपल्या समाजाला, कायद्याला या अत्याचाराची जाणीव व्हावी... पुरुषांना सुखशांती मिळावी अशी मनाेकामना व्यक्त करून जवळपास १०० विवाहित पुरुषांनी रविवारी रामकुंड परिसरात चक्क जिवंत पत्नीचे श्राद्ध घातले. विशेष म्हणजे हा विधी अग्निदेवतेला साक्ष ठेवत अाणि वेदांच्या उच्चारात करण्यात अाला. वास्तव संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातून आलेल्या या पुरुषांनी श्राद्ध करत पती-पत्नी नात्याचे पिंड गोदेमध्ये अर्पण केले.


  मंत्रोच्चारात अग्निदेवतेला साक्षी मानत, सात फेरे घेत सात जन्म साथ देण्याची पती-पत्नी म्हणून शपथ घेतली जाते. सुखी संसार करण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. पण नव्याचे नऊ दिवस संपल्यावर भांड्याला भांडे लागते अाणि सुखी संसाराला नजर लागते. मग सुरू हाेतात पती-पत्नीमधील भांडणतंटे. ही भांडणे एका मर्यादेत अाटाेपली तर संसाराचा गाडा पुढे ढकलला जाताे. मात्र ती पुढे गेली तर थेट घटस्फाेटापर्यंतची वेळ येते. अशा खटल्यांमध्ये पती-पत्नी दाेघांनाही न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. बहुतांश कायदे महिलांच्या बाजूचेच अाहे, असा दावा करीत पुरुष संपूर्ण व्यवस्थेकडेच नकारात्मक दृष्टीने बघू लागतात. अशा अत्याचारग्रस्त पुरुषांनी वास्तव फाउडेशनच्या माध्यमातून एकत्र येत रामकुंडावर हा उपक्रम राबवला. पत्नीपीडित पुरुषांनी जीवित पत्नीच्या पिंडदान केले. हिंदू संस्कृतीप्रमाणेच वेद-मंत्रोच्चारात अग्निदेवतेलाच साक्ष ठेवत श्राद्ध घालण्यात आले. असे अनाेखे श्राद्ध पाहण्यासाठी नागरिकांनीही या ठिकाणी गर्दी केली होती.

  पुरुषांवरील अत्याचाराविरोधात वास्तव फाउंडेशनचे कार्य 
  पुरुषावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वास्तव फाउंडेशनची चार वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी फाउंडेशनच्या वतीने वाराणसी येथेही पत्नीचे पिंडदान करण्यात आले होते. पुरुषाच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठीही वास्तव फाउंडेशनचे कार्य चालते.
  ...म्हणून त्यांनी घातले पत्नीचे पिंड
  हिंदू धर्मात मृत नातलगांचे श्राद्ध व पिंडदानाची प्रथा आहे. पिंडदान करणाऱ्या त्या नात्याची समाप्ती दर्शवते. पती-पत्नीचे नाते संपवण्यासाठी वास्तव फाउंडेशनच्या माध्यमातून विवाहित पुरुषांनी पत्नीचे पिंड घातले. शासनाने पुरुष आयोगाची स्थापना करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.

  पुरुषांवरील अत्याचार समोर आणण्यासाठी 
  अनेकदा काही पुरुषांना काहीही चूक नसताना केवळ कायद्यातील तरतुदीमुळे त्यांना व त्याच्या कुटुंबीयांना न्यायालयात खेटे मारावे लागतात. वेळप्रसंगी तुरुंगात जावे लागते. घटस्फोटाचा निकाल कितीतरी वर्षे मिळत नाही. पुरुषांना आपले जीवन त्रिशंकूमध्ये अडकल्यासारखे वाटते. घटस्फोट झाल्यानंतही मनात पती-पत्नीचे नाते कायम असते. हे नाते मनातून काढण्यासाठी तसेच समाजासमोर विवाहित पुरुषासमोरील अत्याचार समोर आणण्यासाठी जीवित पत्नीचे पिंडदान करण्यात आले. 
  - अमित देशपांडे, अध्यक्ष, वास्तव फाउंडेशन ..........

Post a Comment

 
Top