नवापूर - नवापूर तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावरील रायपूर जामतलाव दरम्यान गुरूवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवून 2 कोटी 41 लाख 50 हजारांची लुट करण्यात आली आहे. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
व्यापारी जळगावहून गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कंपनीचा पैसा घेऊन जात असताना ही लूट करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत पुढील तपास करत आहेत.
संबंधित घटना गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक संजय पाटील नवापूर पोलीस ठाण्यात रात्री बारा वाजेच्या सुमारास आले होते. त्यावेळी पोलिस अधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत वेगाने अधिकाऱ्यांना तपासासाठी रवाना केले. रात्री दोन वाजेपर्यंत कर्मचारी तपास करत होते.-
-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment