ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये अक्षरशः किडे पडले असून या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला आहे. शवागारातील ए.सी. चार दिवसांपासून बंद असल्याने हा प्रकार घडला असल्याचे सिव्हिल प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या या शवागारात 23 मृतदेह असून सध्या बर्फाच्या लाद्या ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांकडूनच वेळेत मृतदेह नेले जात नसून त्यामुळे 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता असलेल्या या शवागारात 30 पेक्षा अधिक मृतदेह ठेवावे लागत असून आता तर ते ठेवणेदेखील कठीण झाले आहे. एसीची दुरुस्ती होत नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासूनचे मृतदेहदेखील या शवागारात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment