शारदीय नवरात्रोत्सवामध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते.
तुळजापूर - अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटकलशाची मिरवणूक काढण्यात आली.

Post a Comment