0
 • Anna Hazare suspended his hunger strike after assurance by government


  काय म्हणाले अण्णा 
  आज महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी होत आहे, याचे औचित्य साधून मी आजपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला वेळोवेळी कळवले. मी आजवर 19 आंदोलने केली. ती सर्व आंदोलने देशासाठी केली आहेत. देशभरात कार्यकर्ते उपोषणाबाबतच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने गिरीष महाजन निरोप घेऊन आले आहेत. सरकारडून आशादायी चित्र दिसते आहे, पण बरेच काही अंतिम झालेले नाही. सरकारकडून मिळालेले आश्वासन आणि सरकारकडून होणारा पाठपुरावा पाहता सध्या आजपासूनचे नियोजित उपोषण मागे घेत असल्याचे अण्णा म्हणाले.
  >> शेतकऱ्यांना हमीभाव
  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळण्यासंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसतेय असे अण्णा हजारे म्हणाले. स्वामीनाथन समितीच्या अहवालानुसार हमीभाव असायला हवे.
  >> लोकपाल-लोकायुक्त 
  लोकपाल नियुक्तीसाठीही केंद्र सरकार वारंवार कारणे पुढे करत आहे. लोकायुक्त निवडीबाबतही तसेच झाले. आता 8 जणांची रिसर्च कमिटी स्थापन झाली आहे, त्यामुळे लोकपाल निवडीचा मार्ग मोकळा झाल्याने आम्ही आशादायी आहोते. लोकपालचा मार्ग मोकळा झाला असला तरी लोकायुक्ताचे काय. राज्यात लोकायुक्त कधी नेमले जाणार. जुने लोकायुक्त काही कामाचे नाहीत. कायद्याप्रमाणे लोकायुक्तांना अधिकार मिळाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांची चौकशी लोकायुक्त करू शकतो, तसे अधिकार त्याला मिळायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत आश्वासन दिले आहे.
  >> ठिबक सिंचन 
  ठिबक सिंचनसाठीचे पाईप 5 टक्के जीएसटीच्या गटात आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
  >> कृषीमूल्य आयोग
  कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल. याबाबत सरकारने आश्वासन दिले आहे, पण वेगाने कार्यवाही होण्याची गरज आहे.
  >> दुधाला खर्चावर आधारित भाव
  दुधाला खर्चावर आधारित भाव मिळण्याबाबतही सरकारने आश्वासन दिले पण लेखी आश्वासन दिलेले नाही. राळेगणसिद्धी...........
 • ले गिरीश महाजन..
  अण्णांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, त्यादिशेने सरकारने पावले उचलली आहेत. अण्णांच्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अण्णांनी ठरवलेले आजपासूनचे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती सरकारच्या वतीने केली आहे. त्यावर आता अण्णाच निर्णय घेतली.

Post a comment

 
Top