0
पुणे- पुण्याच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये चार जवानांनी एका मूक-बधिर महिलेवर 4 वर्षांपासून अत्याचार केल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. पीडितेने यासंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली. परंतु प्रशासनाने तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर पीडितेने इंदूर (मध्यप्रदेश) येथील इंदूरच्या मूक-बधिर संस्थेच्या मदतीन मंगळवारी सायंकाळी खडकी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पीड़ितेने संरक्षण मंत्रालयाला पत्र लिहून अापबिती सांगितली आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिले चौकशीचे अादेश...
संरक्षण मंत्रालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 34 वर्षीय पीडित महिला पुण्यातील आर्मी हॉस्टिपलमध्ये मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. पीडितेने आरोप केला आहे की, 2015 पासून तीन जवानांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला तर एकाने तिचे लैंगिक शोषण केले.
बलात्काराचा व्हिडिओ बनवून नराधकांनी केले ब्लॅकमेल...
पीडितेवर सुरुवातीला एका जवानाने बलात्कार केला. नंतर पीडितेने वरिष्‍ठ अधिकार्‍याकडे तक्रार केली. परंतु त्याने पीडितेच्या लाचारीचा फायदा घेत त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराचा व्हिडिओ बनवून इतर दोन नराधम जवानांनी पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला.
प्रकरणाला अशी फुटली वाचा...
पीडितेने वारंवार तक्रार देऊनही प्रशासनाने यासंदर्भात नराधमांवर कोणतीही कारवाई केली नाही. अखेर महिलेने इंदूर येथील पोलिस हेल्पलाइन आणि एनजीओची मदत घेतली. याप्रकरणी डीआयजीकडे तक्रार नोंद‍विण्यात आली. त्यानंतर एक तक्रार पुण्यातील खडकी पोलिस स्टेशनमध्येही नोंदविण्यात आली. आरोपींविरोधात भादंवि कलम 376 (बलात्कार) आणि 354 (लैंगिक शोषण) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

34 वर्षीय पीडित महिला पुण्यातील आर्मी हॉस्टिपलमध्ये मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

  • Four Army Personnel booked for molesting & raping a speech-impaired woman

Post a Comment

 
Top