0
  • News about Black moneyनवी दिल्ली विदेशांतून किती काळा पैसा देशात आला? त्यातील किती पैसे लोकांच्या खात्यात टाकले तसेच मे २०१४ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत किती केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या व त्याच्याविरुद्ध काय कारवाई झाली, याची माहिती १५ दिवसांत द्यावी, असे निर्देश माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयास दिले आहेत. आयएफएस अधिकारी संजीव चतुर्वेदी यांच्या अपिलावर मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथूर यांनी पीएमओला १५ दिवसांच्या आत ही माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. चतुर्वेदी यांनी एका आरटीआय अर्जात सरकारला १६ मुद्द्यांवर माहिती मागितली होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने याचे उत्तर देण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, काळ्या पैशाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देण्यास नकार देत पीएमओने सांगितले की, हे कलम २( फ) अंतर्गत येत नाही. दस्तऐवज वा इलेक्ट्रॉनिक रूपात अस्तित्वात असलेली माहिती दिली जाऊ शकते, असे या कलमात नमूद आहे.
    हिशेबच दिला नाही... 
    मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी विविध माध्यमांतून किती खर्च झाला याचा हिशेबच पीएमओने अजून दिलेला नाही.

Post a Comment

 
Top