नवी दिल्ली - तोंडावर मास्क घालून आलेल्या 6 सशस्त्र दरोडेखोरांनी दिल्लीतील एका बँकेच्या कॅशिअरला ठार मारले. दिवसा-ढवळ्या पडलेल्या या दरोड्यात त्यांनी 3 लाख रुपयांची लूट केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या धक्कादायक घटनेचा 90 सेकंदांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 90 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दरोडेखोर धारदार शस्त्रांसह घुसले. यानंतर गार्डला मारहाण करून त्याची रायफल हिसकावून घेतली. यानंतर थेट कॅशिअरला गोळ्या घालून रोकड लुटला.

Post a Comment