0
 • बांसवाडा(राजस्थान)| एका कुटूंबाने मुलगी पळवून आणली. पण त्यांना असे करणे खुप महागात पडले. मुलीच्या घरच्यांनी तिच्या प्रेमीचे गरबा पांडालमधून अपहरण केले. रागाच्या भरात मुलीच्या कुटूंबियांनी मुलाला पिलरला बांधून त्याला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. अखेर 9 तासानंतर पोलिसांनी त्या तरुणाची सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. या पीडित तरुणाने सांगितले की, ती मुलगी बालिक आहे आणि तिच्या मर्जीने माझ्यासोबत आली आहे. तर मुलीचे नातेवाईक म्हणतात की, तो मुलीचे अपहरण करुन तिला घेऊन आला आहे.

  मुलगा आणि मुलगी गरबा खेळायला गेले होते 
  ही घटना शहरापासून 35 किमी अंतरावर असलेल्या खमेरा थाना क्षेत्रातील विलवाडापाडा गावात बुधवारी रात्री घडली. शेजारील गाव हावडी येथील नरेश पुत्र मनजी डामोर याचे याच गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ते दोघं पळून गेले. ही गोष्ट मुलीच्या नातेवाईकांना आवडली नाही. या काळात नरेश शेजारील जिल्ह्यातील पीपलखूंटमध्ये आत्या चंपादेवी निनामाच्या घरी गेलेला होता. येथे बुधवारी रात्री तो अंबेडकर चौकात गरबा पाहण्यासाठी गेला होता.
  मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला पिलरला बांधून मारले 
  रात्री जवळपास 11.30 वाजता जीपमध्ये मुलीचे कुटूंबिय आले. त्यांनी नरेशला जीपमध्ये बसवून त्याचे अपहरण केले आणि विलवाडापाडा येथे घेऊन गेले. येथे नरेशला पिलरला बांधण्यात आले. नातेवाईकांनी नरेशला खुप मारहाण केली. तरुणाचे अपहरण करुन मारले हे वृत्त संपुर्ण गावभर पसरले आणि तिथे गर्दी जमा झाली. यावेळी रात्री 1 वाजता पोलिस दल मौक्यावर पोहोचले. पोलिस तिथे पोहोचताच संतप्त नातेवाईकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये एक कॉन्स्टेबल राकेश जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना दवाखाण्यात नेले. 9 तासानंतर पोलिसांनी नरेशची त्यांच्या तावडीतून सुटका केली.

  अपहरण केले नाही, स्वतःच्या मर्जीने पळून आली होती तरुणी 
  पीडित नरेशने पीपलखूंट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांने सांगितले की, मुलगी स्वतःच्या मर्जीने माझ्यासोबत उदयपुरला आली होती. एका महिन्यानंतर मी घरी परत आलो आणि पीपलखूंट या गावी माझी आत्या चंपादेवी यांच्या घरी राहत होतो. येथे रात्री विलवाडापाडा येथे राहणारे कावा पुत्र हेमता, लसीया पुत्र अमरीया, मांगीलाल पुत्र लसीया, गजेश पुत्र हीरा, नाकु पुत्र हेमता, लक्ष्मण पुत्र कन्हैयालाल यांनी त्याला जबरदस्ती जीपमध्ये बसवून नेले आणि मारहाण केली. आता पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.
  यापुर्वीही दाखल केली होती अपहरणाची केस 
  डीएसपी प्रवीण यांनी सांगितले की, तरुणीच्या नातेवाईकांनी यापुर्वीही पीडित विरुध्द अपहरणाची तक्रार दाखल केली होती. यावेळी नातेवाईक म्हणाले की, नरेश त्यांच्या मुलीला घेऊन गेला, पण नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. मुलगी केव्हापासून गेली याचीही पुर्ण माहिती मिळालेली नाही. ते मुलीचा शोध घेत आहे. याप्रकरणी 5 जणानांना अटक करण्यात आली आहे, पुढील तपास सुरु आहे.

  ही घटना शहरापासून 35 किमी अंतरावर असलेल्या खमेरा थाना क्षेत्रातील विलवाडापाडा गावात बुधवारी रात्री घडली.

  • man tied to pillar beaten in banswara village

Post a Comment

 
Top