0
 • Rural Savings Group women are on the run for USमुंबई - राज्यातील ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेमध्ये प्रदर्शन होणार आहे. यात विशेषकरून वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा यात समावेश असेल.


  यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचत गटांच्या काही महिलांचा गट शनिवारी अमेरिकेला रवाना झाला. अाठ दिवसांच्या या दाैऱ्यात या महिला अमेरिकेतील एमआयटी, स्टँडफोर्ट विद्यापीठ, टीआयई चार्टर,फेसबुकसारख्या विविध नामवंत संस्थांना भेटी देऊन जागतिक स्तरावरील उद्योजकतेचीही माहिती घेणार आहेत.

  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्यामार्फत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, फिक्कीचे अतिरिक्त संचालक रुबाब सूद, बचत गट प्रतिनिधी विमल जाधव, राजश्री राडे, अनिता सोनवणे, संगीता गायकवाड यांचा समावेश आहे. हा समूह अमेरिकेतील बोस्टन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को या शहरांना भेटी देणार आहे.

  या दाैऱ्याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील महिला बचत गटातून अनेक महिला लघुउद्योजक पुढे येत आहेत. अनेक महिला बचत गट वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग यशस्वीरीत्या चालवत आहेत. त्यापैकी १०० बचत गटांच्या उद्योजकतेला आम्ही महाअस्मिता नावीन्यपूर्ण उपजीविकी गतीवर्धन कार्यक्रमातून (मिलाप) चालना देत आहोत. या लघुउद्योजक महिला बचत गटांना उद्योजकतेचे आधुनिक प्रशिक्षण देणे, त्यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेची माहिती करुन देणे अशी काही ‘मिलाप’ अभियानाची उद्दिष्टे आहेत. या अभियानांतर्गत फिक्कीच्या सहयोगाने अमेरिका दौऱ्याचे आयोजन करण्यात केले अाहे.’
  राज्यात बचत गटांच्या उद्याेजकतेला चालना मिळणार 
  बचतगट महिला व अधिकारी अमेरिकेतील लघुउद्योग क्षेत्रातील यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती, संशोधक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, टीआयई चार्टरचे सदस्य यांच्या भेटी घेऊन लघुउद्योग आणि गुंतवणूक याबाबतीत चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्रातील वस्त्र उत्पादने, इथली खाद्यसंस्कृती, हातमाग उत्पादने आदींविषयक अमेरिकेतील नागरिकांना विशेष आकर्षण असते. याचा उपयोग महाराष्ट्रातील बचत गटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल याविषयी या दौऱ्यात आदान-प्रदान आणि चर्चा केली जाणार आहे

Post a Comment

 
Top