0
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना जोरदार झटका दिला आहे. पुरोहित यांच्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आता त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यावरील खटल्यास स्थगिती देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आज न्यायालयाने त्यांच्यावरील खटल्यास स्थगिती देण्यास नकार देत त्यांना झटका दिला आहे. दरम्यान, विशेष एनआयए कोर्टाने या प्रकरणातील आरोपनिश्चिती 30 ऑक्टोबरला ठेवली आहे. ‘खटल्याची सुनावणी जलद घ्यावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही या ना त्या कारणाने खटला लांबला आहे. अजून खटला प्राथमिक टप्प्यातच आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश माहीत असूनही आरोपींनी उपस्थित राहण्याचे आज टाळले आहे.’, अशा शब्दांत कोर्टाने आरोपींना फटकारले. तब्बल नऊ वर्षानंतर गेल्या वषी पुरोहित यांची तुरुंगातून सुटका झाली होती. मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा व त्यासाठी स्फोटके उपलब्ध करून दिल्याचा आरोप पुरोहित यांच्यावर होता. विविध चौकशी यंत्रणांनी केलेल्या चौकशीनंतरही त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होऊ शकले नव्हते. त्यामुळे सर्वोच्च 

Post a Comment

 
Top