- नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांचे पूत्र कार्ती चिदंबरम् यांची भारत, ब्रिटन व स्पेनमधील ५४ काेटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील केली अाहे. अायएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली.
सील केलेल्या संपत्तीत दिल्लीतील जाेरबाग, तामिळनाडूतील उटी व काेडाइकनाल येथील बंगले, ब्रिटनमधील घर व स्पेनमधील बार्सिलाेना येथील टेनिस क्लबचा समावेश अाहे. अॅडव्हान्टेज स्ट्रॅटजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेन नावाने चेन्नई येथील एका बॅंकेत असलेली त्यांची ९० लाखांची मुदतठेवही सील करण्यात अाली. ही फर्म कार्ती चिदंबरम् यांची असल्याचा ईडीला संशय अाहे. विशेष म्हणजे ईडीने मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार कार्ती चिदंबरम् व इतरांवर मागील वर्षी गुन्हे दाखल केले अाहेत. अापले पिता पी. चिदंबरम् अर्थमंत्री असताना कार्ती यांनी अायएनएक्स मीडियाला ३०५ काेटींची विदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी ३.५ काेटी रुपये घेतल्याचा अाराेप अाहे.
ईडीच्या कारवाईबाबत कार्ती म्हणाले, सील करण्याची ही कारवाई प्राथमिक अाहे. बातम्या छापून अाणण्यासाठीच या कारवाईचे अादेश देण्यात अाले अाहेत. कायद्यासमाेर ती टिकणार नाही. या कारवाईला अापण अाव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितल
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment