0
  • पुणे- पिंपरी-चिंचवड हद्दीतील थेरगाव येथील एका १२ वर्षांच्या मुलीवर मागील दोन वर्षांपासून वडिलांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस अाली अाहे. हैदराबाद येथे तिच्या नातेवाइकांनी तिला नग्न करून मिरचीची धुरी देत बलात्कार केल्याचा व रेल्वेत साेलापूर अाणि हैदराबाद येथे दाेघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे.


    मुंबई येथील एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीने याबाबत वाकड पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे. थेरगावात २०१६ च्या सुरुवातीपासून हा प्रकार सुरू होता. २०१६ व २०१८ मध्ये वडिलांनीच लैंगिक अत्याचार करून मुलीला धमकावल्याचा प्रकार घडला अाहे. पीडित मुलगी २०१७ मध्ये हैदराबाद येथे नातेवाइकांकडे गेली असताना त्या ठिकाणी नातेवार्इक महिला व तिच्या मुलाने नग्न करून मिरचीची धुरी दिली. त्यानंतर मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रेल्वेने ती पुण्याच्या दिशेने येताना एका अपंग व्यक्तीने हैदराबाद येथे चालत्या रेल्वेत, तर साेलापूर येथे एक हात लहान असलेल्या अनाेळखी व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगण्यात अाले अाहे. पीडित मुंबर्इत संबंधित सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीस सापडली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस अाला अाहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post a comment

 
Top