0
वॉशिंग्टन - पाश्चिमात्य देशांत आफ्रिकासारख्या गरीब राष्टांतील मुलांना दत्तक घेणे कॉमन झाले आहे. खासकरून हॉलीवूड अॅक्ट्रेस एंजेलिना जोली आणि सिंगर मॅडोना यांनी आफ्रिकी मुलांना दत्तक घेतल्यानंतर ही फॅशनच झाली आहे. परंतु आफ्रिकी देशांतून मुलांना दत्तक घेण्याच्या आडून एक मोठे स्कॅम सुरू आहे. 2015 मध्ये अमेरिकेच्या डेविड फॅमिलीने युगांडाहून एक मुलगी दत्तक घेतली होती, परंतु काही महिन्यांतच अशी कहाणी समोर आली, ज्यामुळे सर्वच भयचकित झाले.


असे होते पूर्ण प्रकरण...
- अमेरिकेच्या ओहायोमधील डेविड फॅमिलीला एक आफ्रिकी मुलगी दत्तक घ्यायची होती. यासाठी त्यांनी युगांडाकडे वाट केली.
- एका दत्तक संस्थने अमेरिकी फॅमिलीला 6 वर्षीय मुलगी नमाताची भेट घडवली. संस्थेने कुटुंबाला सांगितले की, या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि तिची आई तिला बेदम मारते. ती तिला शाळेतही पाठवत नाही.
- सन 2015 मध्ये फॅमिलीला युगांडाच्या एका अनाथालयात नेण्यात आले. एक मुलगी एका पिंजऱ्यासारख्या खोलीत दिसत होती. तेथे तिच्याकडे कोणतेही खेळणे नव्हते.
- हे सर्व पाहिल्यानंतर डेव्हिड फॅमिली सहा वर्षांच्या नमाताला दत्तक घेण्यासाठी लगेच तयार झाली.
सहा महिन्यांनंतर समोर आली दुसरी कहाणी- नमाता अमेरिकेला आल्यानंतर 6 महिन्यांनी पूर्ण कहाणी बदलली. मुलगी खूप चांगल्यारीतीने इंग्रजी बोलत होती आणि कुटुंबाला त्यांच्या भाषेत संवाद साधत होती. मुलीने सांगितले की, ती आपल्या देशात शाळेत जायची आणि तिला आपल्या खऱ्या आईची खूप आठवण येते.
- ही गोष्ट फॅमिलीला एकदम विचित्र वाटली. कारण दत्तक संस्थेने त्यांना सांगितले होते की, मुलीची आई तिच्याशी दुर्व्यवहार करत होती.
- हळूहळू नमाताने आपल्या दत्तक जाण्याची पूर्ण कहाणी सांगितली. यानंतर अमेरिकन फॅमिलीने यूएस स्टेट डिपार्टमेंटला कॉल केला. मग नमाताच्या कुटुंबाची खरी माहिती मिळाली.
- डेव्हिड फॅमिलीने नमाताच्या खऱ्या आईशी संपर्क साधला. तिने सांगितले की, तिने कशा प्रकारे थोड्या पैशांसाठी आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली मुलगी स्वत:पासून कायमची दूर केली होती.
- नमाताला स्वत:पासून दूर करण्याशिवाय तिच्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. तिला हेही माहिती होते की, अडॉप्शन पेपरवर स्वाक्षरी घेतल्यानंतर ती आपल्या मुलीला पुन्हा कधीही भेटू शकणार नव्हती. म्हणजेच नमाताला दत्तक संस्थेने स्वीकारले नव्हते, तर तिला खरेदी केले होते. आणि मग अमेरिकी कुटुंबाच्या स्वाधीन केले होते.
- अमेरिकन फॅमिलीने जेव्हा ही दु:खद कहाणी ऐकली तेव्हा नमाताच्या आईच्या भावनांची जाणीव झाली. त्यांना कळले की, अडॉप्शन एजन्सीने खोटे बोलून मुलीच्या आईची भेट न घडवताच मुलगी त्यांना दत्तक दिली होती. त्यांनाही हेही कळले की, गरीब परिस्थितीमुळे नमाताच्या आईने तिला स्वत:पासून दूर केले होते. यावर त्यांनी थोडाही उशीर न करता नमाताला तिच्या आईकडे युगांडाला पाठवले.
Family Adopted A Little Ugandan Girl. But As She Learned English The Terrible Truth Came Out video

Post a Comment

 
Top