- मुंबई - मी टू मोहिमेत लैंगिक शोषणाचे आरोप झालेले क्वान एंटरटेनमेंटचे सह-संस्थापक अनिर्बन ब्लाह यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुंबईतील जुन्या वाशी पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अनिर्बन यांना वाहतूक पोलिसाने वाचवले.
अनिर्बन यांच्यावर चार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बुधवारी अनिर्बन यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. ही कंपनी रणबीर कपूर, ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, श्रद्धा कपूर, जॅकलिन आणि प्रीत इत्यादी कलाकारांसाठी काम करते.
लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर चित्रपट निर्माते मुकेश छाबडा यांची फॉक्स स्टार स्टुडिओजने आपल्या प्रकल्पातून हकालपट्टी केली आहे. कास्टिंग डायरेक्टर असलेले मुकेश हॉलीवूडचा चित्रपट 'द फॉल्ट इन अवर स्टार्स'ची हिंदी आवृत्ती 'किज्जी और मैनी'ची सुरुवात करणार होते. 'गॅँग्ज ऑफ वासेपूर', 'दंगल', 'रॉकस्टार', 'शाहिद' आणि 'काई पो चे' या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलेले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment