0
  • मुंबई- मनसेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही म्हणून ते चिडले आहेत. त्यांना 'सरकार राज' आणायचे आहे. स्वतःला सिद्ध करायचे आहे. नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता आहे त्याने आणि राज ठाकरेंनी एकत्र येत मला छळले, असा धक्कादायक आरोप बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला. दुसरीकडे, बिग बॉसमध्ये जाण्यासाठी तनुश्री दत्ता असे बेताल वक्तव्य करत असल्याचे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कला आहे. तनुश्रीने बेतात वक्तव्य करणे थांबवावे, अन्यथा बिग बॉसचा शो बंद पाडू, असा इशारा खोपकरांनी दिला आहे.

    तनुश्रीने राज यांच्यावर केले हे आरोप...
    मुंबईत पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. राज ठाकरे गुंड आहे, त्याने आपल्या पक्षातही आपल्यासारखेच गुंड घेतले आहेत. त्यांना तो तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतो, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कार फोडल्याचा आरोप तनुश्रीने यावेळी केला होता. नेता तो असतो जो कमकुवत, कमजोर माणसाना संरक्षण देतो. महिलांवर हल्ला करणारा नेता नसतो, अशा शब्दात तनुश्रीने राज यांच्यावर निशाणा साधला आहे.
    नाना पाटेकरला कोणीही भाव देत नाही..
    तनुश्रीने नाना पाटेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत. नाना हा कॅरेक्टर आर्टिस्टच राहिला त्याला कोणीही भाव देत नाही. त्यामुळे तो मुलींसोबत गैरवर्तन करतो. हिरोच्या आसपास अनेक मुली घुटमळताना दिसतात. नाना पाटेकरजवळ तुम्ही एका तरी मुलीला फिरकताना पाहिले आहे का? असाही सवालही तनुश्रीने केला आहे.

Post a comment

 
Top