0
समविचारी पक्षांशी तडजोडी करुन सरकारला घालवू 
जनसंघर्ष यात्रा दोन्ही सरकारांना खाली खेचल्याशिवाय मशाल विझणार नाही 
नाशकातील सभेत अशोक चव्हाण यांचा विश्वास
प्रतिनिधी | नाशिक
सरकारच्या धोरणांना जनता कंटाळली असून केंद्र आणि राज्यातील दोन्ही सरकारांना घालवल्याशिवाय जनसंघर्ष यात्रेची मशाल विझणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी राज्यात समविचारी पक्षांशी आवश्यक त्या तडजोडी करुन फडणवीस सरकारला घालवू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.
जनसंघर्ष यात्रेनिमित्त नाशिकमधील य. म. पटांगणावर रविवारी (दि. ७) रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. 
मुख्यमंंत्र्यांनी दत्तक नाशिकला दिला 'बाबाजी का ठुल्लू' सविस्तर. 'दिव्य सिटी'
सटाणा : अावाज बुलंद करण्यासाठी 'जनसंघर्ष'
चांदवड : राज्य १० ते २० वर्ष मागे गेले . पान १२
सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हाच भाजप सरकारचा धंदा
प्रतिनिधी | मालेगाव
भाजप सरकारने देशाचे व राज्याचे वाटाेळे केले अाहे. थापा मारणारे हे सरकार सहजासहजी जाणार नाही. त्यांना सत्तेतून घालवावे लागेल. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र व जनतेच्या नशिबी दारिद्रय अशी परिस्थिती निर्माण झाली अाहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता मिळवणे हाच केंद्र व राज्य सरकारचा धंदा बनला असल्याची टीका करत जनतेसाठी अाम्ही लाठ्या खाण्यास तयार अाहाेत तुम्ही फक्त अामच्या पाठीशी उभे रहा उर्वरित. पान १२
चव्हाणांची जीभ पुन्हा घसरली
भाषणादरम्यान केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना खासदार चव्हाण यांची जीभ घसरली. शाळेचा मुलगा मास्तरांच्या टेबलवर उभा राहून लघवी करताे. मास्तर तक्रार करण्यासाठी मुलाच्या वडिलांकडे जातात. तेव्हा मुलाचे वडिल घराच्या धाब्यावर उभे राहून लघवी करत असतात. सध्या अशीच परिस्थिती केंद्र व राज्यात पहावयास मिळत असल्याचे उदाहरण चव्हाण यांनी दिले. उदाहरणातून थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर अंगुलीनिर्देश करण्याचा प्रयत्न असला तरी यासाठी कमरेखालच्या भाषेचा वापर झाल्याने चव्हाणांचे हे उदाहरण अशाेभनिय असल्याची चर्चा हाेत अाहे. मालेगाव महापालिका निवडणुकीवेळीही एका प्रचार सभेत खासदार चव्हाण यांची जीभ घसरल्याने त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना 'साले' म्हणून संबाेधले हाेते. 

Post a Comment

 
Top